अनुभूती an experience !!

Wednesday 8 October, 2008

आठवण

निसटले मूठीतून
काही स्वप्नांचे क्षण
ओघळून डोळ्यांतून
वेडया आठवांचे कण

Labels:

प्रश्न ?

आज जे जे वाटतयं, आठवतयं, अडखळतेय, कुठेतरी ठेचाळतय, ते सगळ सांगायचं आहे; कचकड्याचा भार कमी करायचा आहे जरा.


समांतरपणाच्या दिशांनी साकळलेलं आयुष्य प्रवाही का नाही करायचं ?
का म्हणून सात्विक भावांची स्निग्धता जपायचा बडेजाव करायचा ?


हे रस्ते आपणच घडवित असताना,
नीती- अनीतीच्या सनातन कसोट्यांत का स्वतःला बुकलून घ्यायचं ?


आपल्या सार्‍या आणि सार्‍याच संर्दभांच जितेपण अजून ताजं असताना,
का रहायचं अशा हस्तिदंती मनोर्‍यात?
साचेबंद आयुष्यात..........

Labels:

Tuesday 7 October, 2008

अपेक्षा

Sitting quietly,
doing nothing,
summer comes,
and the grass
grows by itself
- Zen wisdom




Labels:

Monday 6 October, 2008

Self Potrait

दिवसांच धुक पुसट होत जाताना
ओलाव्याचा स्पर्श हलकेच विरून जाताना
जाणवतो मला,
- उसवून चाललेला एकेक बंध
- धुसरं होत असलेल एकेक नातं
हृदयावर कोरुनही, अजून मनभर रूजवलेलं.
आठवणींच्या गाठोड्यात जाणीवपूर्वक जपलेलं.
असा कोणता हा आचार ?
असला कोणता हा विकार ?
सापडतो असाच कधीतरी मला,
आकृतिबंधात अडकलेला माझाच आकार

Labels:

Sunday 5 October, 2008

श्रीगणेशा

तसा बर्‍याच दिवसांपासून डोक्यात विचार चालू होता,
आपणसुद्धा एक ब्लॉग लिहून पाहूयात का?.........................................
आज बसू... उद्या बसू... अस करत, कितीतरी दिसू असेच गेले.
आज अनायासे झोपही लागत नव्हती. मग म्हटलं चला शुभस्य शीघ्रम! चांगली ब्राम्ह्य मुहुर्तालाच सुरुवात करुयात. आणि माझ्या ब्लॉग वर माझी पहीली - वहीली post झळकली.

मला तर पहिल्या- वहिल्या सर्वच गोष्टींच भारी कौतुक
...but natural, human tendencyचं आहे ती.
का कोण जाणे, आज इतक छान वाटतेय ना. किती दिवसांनी पेक्षा महिन्यांनी मी काहीतरी लिहायला घेतल्याचा आनंद जास्त होतोय.


मधला इतका मोठा काळ जणू गोठल्यागत......

राहून - राहून माझ्या पहिल्या डायरीची पण आठवण येतेय;
मग तिच्या नंतर किती डायर्‍या आल्या आणि गेल्या. काही भरल्या, काही अर्धवट राहिल्या, काही मुद्दामच नाही लिहील्या, काही नकळत हरवल्या, तर काही जाणतेपणी हरवल्या गेल्या, काहींमध्ये मीच इतके हरवले, की मग त्यांच्या भुल-भुलैयातून बाहेर पडले, ते कायमचीच...

प्रत्येकीला 'स्वाहा' करताना त्यांची किती पारायणं !
कितीतरी आठवणी....................

सगळीकडे शब्दांनी अगदी उतु गेलेली पानं,
काही अगदीचं २-४ टिंबांसाठी कोरी सुटलेली,
काही इलुश्या पक्षांच्या उडण्यासाठी मोकळं आभाळं झालेली,
तर काही पानं चक्क पावसाच्या थेंबांनी भिजलेली,
कुठे जगजितच्या गझला ऐकुन झोपी गेलेली पानं,
तर काही माझ्या आदिम चित्रलिपींनी भरलेली.
शब्दांपेक्षा मला चित्रच जास्त आवडायची, आजही आवडतात.

एकेक डायरी मी माझ्याच हाताने फाडून टाकली.
योग्य - अयोग्य असा न्यायनिवाडा नव्ह्ताच मुळी.
आपण पण एकदा आठवणींची कात टाकून बघायला काय हरकत आहे.

बस.... आता पुरे म्हटल, आणि शेवटचं अर्घ्य देऊन टाकलं.
It's a new Day
It's a new Start

- वर्षा ऋतु

Labels: