अनुभूती an experience !!

Sunday 5 October, 2008

श्रीगणेशा

तसा बर्‍याच दिवसांपासून डोक्यात विचार चालू होता,
आपणसुद्धा एक ब्लॉग लिहून पाहूयात का?.........................................
आज बसू... उद्या बसू... अस करत, कितीतरी दिसू असेच गेले.
आज अनायासे झोपही लागत नव्हती. मग म्हटलं चला शुभस्य शीघ्रम! चांगली ब्राम्ह्य मुहुर्तालाच सुरुवात करुयात. आणि माझ्या ब्लॉग वर माझी पहीली - वहीली post झळकली.

मला तर पहिल्या- वहिल्या सर्वच गोष्टींच भारी कौतुक
...but natural, human tendencyचं आहे ती.
का कोण जाणे, आज इतक छान वाटतेय ना. किती दिवसांनी पेक्षा महिन्यांनी मी काहीतरी लिहायला घेतल्याचा आनंद जास्त होतोय.


मधला इतका मोठा काळ जणू गोठल्यागत......

राहून - राहून माझ्या पहिल्या डायरीची पण आठवण येतेय;
मग तिच्या नंतर किती डायर्‍या आल्या आणि गेल्या. काही भरल्या, काही अर्धवट राहिल्या, काही मुद्दामच नाही लिहील्या, काही नकळत हरवल्या, तर काही जाणतेपणी हरवल्या गेल्या, काहींमध्ये मीच इतके हरवले, की मग त्यांच्या भुल-भुलैयातून बाहेर पडले, ते कायमचीच...

प्रत्येकीला 'स्वाहा' करताना त्यांची किती पारायणं !
कितीतरी आठवणी....................

सगळीकडे शब्दांनी अगदी उतु गेलेली पानं,
काही अगदीचं २-४ टिंबांसाठी कोरी सुटलेली,
काही इलुश्या पक्षांच्या उडण्यासाठी मोकळं आभाळं झालेली,
तर काही पानं चक्क पावसाच्या थेंबांनी भिजलेली,
कुठे जगजितच्या गझला ऐकुन झोपी गेलेली पानं,
तर काही माझ्या आदिम चित्रलिपींनी भरलेली.
शब्दांपेक्षा मला चित्रच जास्त आवडायची, आजही आवडतात.

एकेक डायरी मी माझ्याच हाताने फाडून टाकली.
योग्य - अयोग्य असा न्यायनिवाडा नव्ह्ताच मुळी.
आपण पण एकदा आठवणींची कात टाकून बघायला काय हरकत आहे.

बस.... आता पुरे म्हटल, आणि शेवटचं अर्घ्य देऊन टाकलं.
It's a new Day
It's a new Start

- वर्षा ऋतु

Labels:

8 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]



<< Home